Bhandara Bypass | ६५० कोटींचा बायपास उद्घाटनापूर्वीच निकृष्ट कामामुळे वाहून गेला!

भंडारा शहरालगत मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर सुमारे ६५० कोटी रुपये खर्चून बायपासची निर्मिती करण्यात आली होती. जोरदार पावसामुळे या बायपास महामार्गाचा सुरक्षा कठडा वाहून गेला आहे. सिमेंटचा कठडा वाहून गेल्याने त्याखालील माती पाण्याबरोबर बाहेर निघायला सुरुवात झाली आहे. या महामार्गावरून मोठ्या प्रमाणात जड वाहनांची आणि चारचाकी वाहनांची वाहतूक असते. भंडारा शहरात होणारी वाहतुकीची कोंडी आणि अपघाताचे प्रमाण लक्षात घेता, हा बायपास महामार्ग उद्घाटनापूर्वीच वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला होता. कोट्यवधी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या या बायपास महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याचा आरोप आता करण्यात येत आहे. या घटनेमुळे सार्वजनिक बांधकाम कामांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola