Bhai Jagtap becomes Mumbai Congress President | भाई जगताप मुंबई काँग्रेसचे नवे अध्यक्ष
मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी भाई जगताप यांची नियुक्ती करण्यात आलीय. तर चरणसिंह सप्रा यांची कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलीय.अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्याला मंजुरी दिली आहे. मुंबई काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्याबाबत पक्षांतर्गत नाराजीचा सूर होता. त्यामुळेच हे खांदेपालट करण्यात आले आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी अनेक जण इच्छुक होते. यामध्ये वर्षा गायकवाड, मिलिंद देवरा, चरणसिंह सप्रा, अस्लम शेख यांचा समावेश होता.