नाशिकच्या म्हैसमाळ गावात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आलं पाणी, ग्रामस्थांकडून पाण्याचं वाजतगाजत स्वागत
Continues below advertisement
नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील म्हैसमाळ गावात स्वातंत्र्यनंतर पहिल्यांदाचा नळाला पाणी आलं. त्यामुळे म्हैसमाळकरांनी वाजत गाजत पाण्याचं स्वागत केलं. ((आदिवासी पारंपरिक वाद्य वाजवत आणि नृत्य करत ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला. म्हैसमाळ आणि आजूबाजूच्या गावात दुष्काळ पाचवीलाच पुजलेला. मध्यरात्रीच्या वेळीही महिलांना टेम्भे घेऊन पाणी भरण्यासाठी थेट विहिरीत उतरावे लागत होते. या संदर्भातील वृत्त एबीपी माझाने दोन वर्षांपूर्वी प्रसारित केले होते. त्यानंतर सोशल नेटवर्किंग फोरम या संस्थेन पुढाकार घेतला. दीड वर्ष मेहनत घेतली. श्रमदानातून विहीर खोदली, पाण्याची टाकी उभारली आणि अखेर गावात पाणी पोहोचले. सोशल नेटवर्किंग फोरमचे प्रमोद गायकवाड यांना ग्रामस्थांनी अक्षरशः खांद्यावर घेऊन नाचवले.
Continues below advertisement