Belgaum Rain | मुसळधार पावसात कर्तव्य बजावणाऱ्या वायरमनला सॅल्यूट, व्हिडीओ व्हायरल

मुसळधार पावसात देखील विद्युत पुरवठा करण्यासाठी करण्यासाठी वायरमन कार्यरत असतात. मुसळधार पावसात तर या वायरमन असलेल्या कर्मचाऱ्यांना पावसात भिजत जीवाची पर्वा न करता काम करावे लागते. अशाच एका वायरमनचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. या व्हिडीओत दिसणारा वायरमन पहिला तर तुम्ही त्याला नक्कीच एक कडक सॅल्यूट द्याल. या व्हिडीओत दिसत आहे की, चारही बाजूने विजेच्या खांबा भोवती पाणी साठले आहे. अशा परिस्थितीत हा वायरमन स्वतःच्या जीवावर उदार होऊन जनतेची सेवा करत आहे. जनतेच्या घरातील अंधार जाऊन उजेड यावा म्हणून धडपडणाऱ्या या वायरमन आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola