Zero Hour : Pankaja Munde : पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ साखर कारखान्यावर जप्तीची वेळ का आली?

Continues below advertisement

बातमी परळीतील मुंडेंच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची... आधीच अडचणीत सापडलेल्या या कारखान्याची १९ कोटींची मालमत्ता जीएसटी आयुक्तालयाने आज जप्त केली. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी साधारण 23 वर्षांपूर्वी या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. परळी तालुका आणि परिसरातील शेतकऱ्यांचा ऊस जागेवरच जळून जायचा किंवा बांधावर फेकून द्यावा लागायचा त्यांच्यासाठी हा कारखाना वरदान ठरला. अल्पावधीतच मराठवाड्यातील उसाचे विक्रमी गाळप करणारा कारखाना म्हणून वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची ओळख झाली. गोपीनाथ मुंडे यांनी याच वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या जीवावर राज्यभरातील वीस सहकारी साखर कारखाने चालवण्यासाठीही घेतले होते. गोपीनाथ मुंडे यांच्या काळातही साखर कारखान्यावर कर्ज होते पण कारखाना तुलनेनं सुस्थितीमध्ये होता. पण गोपीनाथ मुंडे यांचं अपघाती निधन झालं आणि त्यानंतर या साखर कारखान्याला उतरती कळा लागली असं जाणकार सांगतात. त्यातच चेअरमन पंकजा मुंडे यांची काही राजकीय गणितं चुकली, त्याचा परिणाम कारखान्याच्या आर्थिक गणितावर होत गेला का आणि हे संकटं अजून गहिर बनत गेलं का असा सवाल ही अनेक जण करत आहेत . याच विषयावर आम्ही विचारला होता एक प्रश्न.. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram