Beed Rain : बीडमध्ये अवकाळी पाऊस, टरबुज उत्पादक शेतकऱ्याचं तीन लाखांहून अधिकचं नुकसान
Continues below advertisement
राज्यात अनेक ठिकाणी गारपिटीसह अवकाळी पावसाने हजेरी लावलीये. नागपुरात भर उन्हाळ्यात पावसाने हजेरी लावल्याने हवेत गारवा निर्माण झालाय. ३० अंशावर पार असलेलं तापमान अवकाळी पावसामुळे १९ अंशावर आलंय. नागपूरसह गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्याला ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आलाय. तर गेल्या तीन दिवसांपासून भंडाऱ्यातही पावसाने हजेरी लावलीये.. भंडाऱ्यात पाच दिवस पावसाचा इशारा देण्यात आलाय. तर तिकडे वर्ध्याच्या हिंगणघाटमध्येही गारपिटीसह मुसळधार पाऊस झालाय. या पावसामुळे तीन एकरावरील टरबुजाच्या पिकाचं नुकसान झालंय. टरबुज उत्पादक शेतकऱ्याचं तीन लाखांहून अधिकचं नुकसान झालंय.
Continues below advertisement