Beed Accident Death | बीडच्या रुग्णालयात अपघातग्रस्तांना जमिनीवर झोपवलं,दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू
कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर जीप आणि दुचाकीचा अपघात झाला होता. या अपघातातील दुचाकीवरील दोन तरुण गंभीर जखमी झाले होते. तरुणांवर नजीकच्या रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना बीडच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं मात्र या रुग्णावर कसलाच उपचार झाला नाही, शिवाय रुग्णांना बेडवर नाही तर चक्क जमिनीवर झोपवलं गेलं.
दोन्ही रुग्ण जमिनीवर तडफडत होते, तरीदेखील एकही डॉक्टर किंवा कर्मचारी या रुग्णांच्या मदतीला धावून आला नाही. रुग्ण तडफडत असतानाचा एक व्हिडीओ सोशल माध्यमावर चांगलाच वायरल होतोय. उपचार सुरू असताना या दोन्ही तरुणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय.