ABP News

Suresh Dhas on Mahadev Munde :आकाच्या मुलाचे बॉडीगार्ड म्हणून फिरणारेच महादेव मुंडे प्रकरणाचे आरोपी

Continues below advertisement

मुंबई : बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणानंतर बीडमध्ये संताप व्यक्त करत आरोपींच्या अटकेची मागणी करण्यात आली. त्यानंतर, राज्यभरात या घटनेचा तीव्र निषेध करत अनेक जिल्ह्यात मराठा बांधवांनी मोर्चेही काढले, देशमुख कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी लोकं रस्त्यावर उतरले होते. आष्टीचे आमदार सुरेश धस यांनीही हे प्रकरण लावून धरले होते, विधिमंडळातही त्यांनी हा मुद्दा उचलून धरला. त्यानंतर, याप्रकरणी आरोपीला अटक झाली असून पुढील तपास सुरू आहे. त्यातच, परळीतील महादेव मुंडे हत्याप्रकरण आणि डीपीडीसीतील घोटाळा प्रकरणावरुन सुरेश धस (Suresh dhas) आक्रमक झाले आहेत. याप्रकरणी, आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन गेल्या 5 वर्षातील चौकशीची मागणी करणार असल्याचे आमदार धस यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले. बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आज अजित पवारांची (Ajit pawar) भेट घेतल्यानंतर आमदार धस यांनी प्रतिक्रिया दिली. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज बीडचे कलेक्टर अविनाश पाठक यांनी भेट घेतली. यासंदर्भात धस यांना प्रश्न विचारला असता, नियोजन विभागाने 2 वर्षाच्या प्रशासकीय मान्यता मागितल्या आहेत, त्याबाबत त्यांनी अजित पवारांशी चर्चा केली आहे. मी अजित पवारांची भेट घेऊन 5 वर्षांच्या प्रशासकीय मान्यता चेक करण्याबाबत बोलणार आहे. कारण, सर्वाधिक जास्त घोटाळा 2019 मध्ये झाला आहे. तर, 72 कोटींच्या घोटाळ्याची यादी मी स्वत: अजित पवारांना दिल्याचे धस यांनी म्हटले. तसेच, 2019 ते 2022-23 मधे सर्वाधिक भ्रष्टाचार झाला आहे. सध्या नियोजन विभागाने केवळ 2024 आणि 2025 ची चौकशी लावली आहे. मी उद्या अजित पवारांना विनंती करणार आहे, मागील 5 वर्षांची चौकशी करा. कारण, 25 जून 2023 पर्यंत सर्वांत जास्त बोगस बिले काढण्यात आली आहेत, असेही धस यांनी म्हटले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram