Santosh Deshmukh Wife Reaction | एक महिन्याआधी धमकी आली होती, संतोष देशमुखांच्या पत्नीचा खुलासा
संतोष देशमुखांच्या हत्या आधी एक महिना धमकी आली होती असं संतोष देशमुखांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी सीआयडी कडे जबाब नोंदताना म्हटलं. जिवे मारण्याची धमकी दिल्यामुळे देशमुख अस्वस्थ होते असंही त्यांनी सांगितलय. नोव्हेंबर महिन्यातच देशमुखांना धमकी आल्याचा जवाब त्यांनी दिलाय. अश्विनी देशमुखांनी 3 जानेवारीला जवाब दिल्याची सूत्रांची माहिती तर या प्रकरणी संतोष देशमुखांच्या पत्नीशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी पाहूया ...
हे देखील वाचा
Walmik Karad : पुण्याच्या फर्ग्युसन रोडवर वाल्मिक कराडची प्रॉपर्टी, एकाच बिल्डिंगमध्ये सहा अलिशान ऑफिस, आता कर्दनकाळ ईडीची एन्ट्री होणार?
बीड : परळी आणि बीडममध्ये गुन्हेगारी मार्गाने कमावलेल्या पैशातून वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीने राज्यातील वेगवगेळ्या शहरांत कोट्यवधी रुपयांच्या मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप होत आहे. त्यातूनच पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या समोर असलेल्या इमारतीत वाल्मिक कराड आणि टोळीने 25 कोटी रुपये खर्चून सहा ऑफिस स्पेसेस विकत घेतल्याचा दावा करण्यात येतोय . त्यातूनच आता या प्रकरणात ईडीची एंट्री होऊ शकते अशी चर्चा सुरु झाली आहे .
पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या बरोबर समोर काम सुरु असलेल्या असलेल्या एका इमारतीत वाल्मिक कराड, त्याच्याशी संबंधित एक महिला आणि विष्णू चाटेच्या नावे सहा ऑफिस स्पेसेस बुक करण्यात आल्या आहेत.पंचवीस कोटी रुपये मोजून वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीने या इमारतीत या ऑफिस स्पेसेस खरेदी करण्यासाठी बिल्डरसोबत करार केल्याचं समोर आलं आहे.