Santosh Deshmukh Case CID | संतोष देशमुखांच्या तिन्ही आरोपींना 14 दिवसांची CID कोठडी ABP Majha

बीड  : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी (Santosh Deshmukh Murder Case ) ताब्यात घेण्यात आलेल्या सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणे या तीनही आरोपींना 14 दिवसांची सीआयडी कोठडी देण्यात आली आहे. केज न्यायालयाचे प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी एस व्ही पावसकर यांनी ही शिक्षा सुनावली आहे.  या तीनही आरोपींना 25 दिवसांनंतर अटक करण्यात आली आहे. 

मस्सोजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या पंचवीस दिवसानंतर, तीन मुख्य आरोपींना अटक करण्यात यश आलं आहे. फरार असलेला मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळेच्या मुसक्या एसआयटीच्या पथकाने बालेवाडीत आवळल्या. अद्याप या प्रकरणातील आणखी एक आरोपी कृष्णा आंधळे मात्र फरार आहे. 

संतोष देशमुखांचा ठावठिकाणा सांगणाऱ्याला अटक

आरोपींना मदत करणाऱ्या डॉ. संभाजी वायभसेंनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्याच्याच चौकशीत या आरोपींचा ठावठिकाणा कळाल्याचं सांगण्यात येतंय. या दोन मुख्य आरोपींसह, हत्येच्या दिवशी सरपंचाचा ठावठिकाणा दिल्याच्या संशयाखाली कल्याणमधून सिद्धार्थ सोनवणेला ताब्यात घेतलं आहे. सिद्धार्थ सोनवणे हा मस्साजोगचाच रहिवासी आहे. सरपंचाची हत्या झाल्यानंतर तो गावातच होता. याशिवाय अंत्यविधीला देखील तो उपस्थित होता.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola