Sanjay Raut Sushma Andhare : सुषमा अंधारेंच्या होमग्राऊंडवर धडाडणार संजय राऊतांची तोफ ABP Majha

ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेचा आज बीडमध्ये समारोप होतोय... या सभेसाठी खासदार संजय राऊत आणि नेत्या सुषमा अंधारे बीडमध्ये दाखल झालेत... सत्तासंघर्षावरच्या निकालानंतर ही सभा होत असल्याने राऊत - अंधारे सरकारचा कसा समाचार घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. शिवाय़ सभेपूर्वी दोन दिवस आधी सुषमा अंधारेंवर झालेला आप्पासाहेब जाधव यांनी केलेला आरोप आणि नंतर हकालपट्टी यावरून घडलेलं महाभारत यावरून सुषमा अंधारे टीकेचे कोणते बाण सोडणार, याचीही बीडकरांना उत्सुकता आहे. दरम्यान, महाप्रबोधन यात्रेच्या समारोपाला जाण्यापू्र्वी राऊत आणि अंधारे यांनी वैजनाथ  परळी येथे जाऊन ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतंल. त्यानंतर गोपीनाथ गडावर जाऊन गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचंही दर्शन घेतलं...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola