Raj Thackeray Beed : बीडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून राज ठाकरे यांचं जंगी स्वागत
Continues below advertisement
राज ठाकरेंनी गडावर उतरताच आधी गोपीनाथ मुंडेंच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्यानंतर पांगरी गावातल्या चौकात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून त्यांचं स्वागत करण्यात आलं. पांगरी गावचे सरपंच आणि धनंजय मुंडे समर्थक सुशील कराड यांनी राज यांच्यासाठी ५० फुटांचा हार बनवला होता. त्या हारासाठी एक टन फुलांचा वापर करण्यात आला होता. राज यांच्या स्वागतासाठी खास मुंबईहून ढोलपथक बोलावण्यात आलं होतं. राज ठाकरेंनी गाडीतून उतरून स्वागताचा स्वीकार केला. त्यानंतर परळीतही मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांचं स्वागत केलं.
Continues below advertisement