Dhananjay Munde Rape Case | धनंजय मुंडे बलात्कार प्रकरणावर बीडकरांना काय वाटतं?
मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. याबाबत मुंडे यांनी आपली बाजू स्पष्ट केली असून ब्लॅकमेलिंगच्या उद्देशाने आरोप होत असल्याचं म्हटलं. परंतु विरोधकांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. यातच आता एक नवा ट्विस्ट आला आहे. कारण भाजप नेते आणि माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी काही खळबळजनक दावे केले आहेत. एवढंच नाही तर हेगडे हे धनंजय मुंडेंच्या विरोधात तक्रार करणाऱ्या महिलेच्या विरोधात तक्रार करण्यासाठी अंबोली पोलिस ठाण्याकडं निघाले असल्याची माहिती त्यांनी दिलीय.