Pankaja Munde Full Speech : चारित्र्यहीन लोकांना पाडणार म्हणजे पाडणार, भगवान भक्ती गडावरुन शपथ
Continues below advertisement
चारित्र्यहीन आणि पैशांच्या जोरावर निवडून येणा-यांना आता पाडणार असा एल्गार भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडेंनी (Pankaja Munde) केल आहे. पंकजा मुंडे यांचा रोख नेमका कोणाकडे होता असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होतोय. जिंकून येण्याासठी तुम्ही निष्ठा गहाण टाकू शकत नाही असा घरचा आहेर त्यांनी नाव न घेता पक्षाला दिलाय. 2024 पर्यंत तुम्हाला न्याय देण्यासाठी मी मैदनात उतरणार असे म्हणत पंकजा मुंडेंनी निवडणुका लढवण्याचे संकेत दिले आहे. सावरगाव इथे पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा (Pankaja Munde Dasara Melava) पार पडला. त्यात हजारोंच्या जनसमुदायासमोर त्यांनी हा इशारा दिला.
Continues below advertisement