Pankaja Munde Full Speech : लेकाचं लाँचिंग, धनूभाऊसमोर पहिलं भाषण, भगवानगडावर पंकजांचा हल्लाबोल

Continues below advertisement

Pankaja MUnde : अहमदनगर : राज्यात आज दसरा मेळाव्यांच्या माध्यमातून राजकीय नेत्यांच्या तोफा धडाडत आहेत. बीड जिल्ह्यातील नारायणगडावर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांचा दसरा मेळावा मोठ्या उत्साहात व गर्दीच्या साक्षीने संपन्न झाला. मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला मेळाव्यातून इशारा दिलाय. तर, दुसरीकडे पंकजा मुंडेंच्या नेतृत्वात पाथर्डी तालुक्यातील भगवानगडावरही मेळावा संपन्न झालाय. या मेळाव्यातून पंकजा मुंडेंनी जमलेल्या भाविक न नागरिकांना भावनिक साद घातली. तसेच, सध्याच्या जातीय राजकारणवरही भाष्य केलंय. यावेळी नाव न घेता त्यांनी मनोज जरांगेंना अप्रत्यक्षपणे लक्ष केलं. आम्हाला अधिकाऱ्याचा सीआर पाहूनच त्याला काम द्यायचंय, त्याची जात बघून देणाऱ्याची औलाद गोपीनाथ मुंडेंची (Gopinath Munde) नाही. आम्हाला काम करणाऱ्या लोकांच्या पाठीशी उभं राहायचंय, जातीवर स्वार होणाऱ्यांच्या पाठीशी उभं राहायचं नाही, असे पंकजा मुंडेंनी म्हटल्या. 

छत्रपतींच्या घराण्यानेही गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम केलंय. माझ्यावरही छत्रपतींच्या घराण्यातून प्रेम केलं जातंय, छत्रपती उदयनराजेंनी त्यांच्या देवघरात माझ्या हातून पूजा केली. उदयनराजेंनी घरात एका ठिकाणी मला नेऊन दाखवलं, तिथं गोपीनाथ मुंडेंसाहेबांचा फोटो होता. पण, आज काय झालंय समाजाला, एखाद्याला एखाद्या गाडीने उडवलं तर, लोकं म्हणतात, गाडीच्या ड्रायव्हरची जात काय आणि उडवलं त्याची जात काय. आज एखाद्या मुलीवर अत्याचार झाला, तर लोक विचारतात त्या नराधमाची जात काय आणि मुलीची जात काय, हा असा समाज घडविण्यासाठी आम्ही आमच्या आयुष्यातील वर्षे खर्च केली नाहीत. 

आम्हाला अधिकाऱ्याचा सीआर पाहूनच त्याला काम द्यायचंय, त्याची जात बघून देणाऱ्याची औलाद गोपीनाथ मुंडेंची नाही. आम्हाला काम करणाऱ्या लोकांच्या पाठीशी उभं राहायचंय, जातीवर स्वार होणाऱ्यांच्या पाठीशी उभं राहायचं नाही, असे म्हणत नाव न घेता मनोज जरांगे यांना टोला लगावला. मला या देशात आणि राज्यात एखाद्यानं अधिकाऱ्याचं नाव घेऊन फाईल आणली की ते म्हणतात, ताई आपला जवळचा आहे, आपला पाहुणा आहे. पण, त्याच्यावर विनयभंगाची केस असेल तर कसला पाहुणा?, असे म्हणत पंकजा मुंडेंनी सध्याच्या जातीय राजकारणावर भाष्य केलंय.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram