Pankaja Munde Call Recording : पंकजा मुंडेचा अपक्ष उमेदवाराला फोन, अर्ज मागे घेण्याची विनंती

Bajrang Sonwane on Pankaja Munde, Beed Loksabha : महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि अपक्ष उमेदवार रविकांत राठोड यांच्यातील ऑडिओ क्लिप समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. यावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोगाने यात पुढाकार घेऊन चौकशी करावी. तसेच पोलीस अधिकाऱ्यांनी देखील स्वतःहून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सोनवणे यांनी केली. तर जिल्ह्यात केवळ भावनिक राजकारण केलं जात आहे. दहा वर्षात कोणताही विकास केला नाही, असा आरोप सोनवणे यांनी यावेळी केलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola