Dhananjay Munde speech Bhagwan Gad :12 वर्षाचा प्रारब्ध आता संपला, भावाचं बहिणीसाठी पहिलं भाषण, UNCUT

Continues below advertisement

बीड : महाराष्ट्रात दसरा मेळाव्याची (Dasara Melava 2024) परंपरा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भगवानगडावर दिवंगत गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) दसरा मेळावा घायचे. त्यांच्या निधनानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) या दसरा मेळावा घेत आहेत. यंदा बीडच्या नारायणगडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दसरा मेळावा घेतला. या मेळाव्यावरून कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मनोज जरांगेंवर नाव न घेता टीका केली आहे.  

धनंजय मुंडे म्हणाले मी, ताई मी आज एवढा भारून गेलोय की, बारा वर्षाच्या तपानंतर दसऱ्याचा मेळावा आलाय. या पवित्र दसरा मेळाव्याची एक आगळीवेगळी परंपरा आहे. ही परंपरा माझ्या या सर्व पिढीला लक्षात आली पाहिजे समजली पाहिजे. भगवानगडाचा वर्धापन दिन म्हणजे दसरा मेळावा भगवान बाबांच्या पवित्र हातांनी सोनं देऊन केला जायचा. या पवित्र दसरा मेळाव्याची परंपरा आपल्या सगळ्यांचं दैवत मुंडे साहेबांनी शेवटच्या श्वासापर्यंत चालवली. आणि त्यानंतर ही पवित्र दसरा मेळाव्याची परंपरा माझ्या भगिनी पंकजाताई मुंडे चालवत आहेत. मोठा भाऊ म्हणून अभिमान आहे. 12 वर्षाचा प्रारब्ध मीही भोगला आणि त्यांनीही भोगला. हा प्रारब्ध आता संपला आहे, असे त्यांनी म्हटले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram