Dhananjay Deshmukh Protest : जरांगेंनी हात जोडले, एसपींनी विनंती केली;अखेर 2 तासांनी देशमुख खाली आले

Continues below advertisement

Dhananjay Deshmukh Protest : जरांगेंनी हात जोडले, एसपींनी विनंती केली;अखेर 2 तासांनी देशमुख खाली आले

Santosh Deshmukh : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिना पूर्ण होऊनही पोलिस तपासाची माहितीच देत नसल्याचा गंभीर आरोप करताना सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आज गावच्या पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले आणि न्यायासाठी आक्रोश केला. यावेळी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. आंदोलनामध्ये गावच्या महिलांनी सुद्धा उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या. 

पोलीस अधीक्षक नवनीत काॅवत यांच्यावर बांगड्या फेकल्या

आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांनी मुख्य आरोपी अजूनही मोकाट कसा? त्याला का 302 च्या कलमाखाली अटक करण्यात आली नाही? असा संताप व्यक्त करत सवाल उपस्थित केला. यावेळी जमलेल्या महिलांनी पोलीस प्रशासनाविरोधात आक्रोश व्यक्त करताना बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काॅवत यांच्यावर बांगड्या सुद्धा फेकल्या. संतप्त महिलांनी संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामध्ये पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप केला. एसपींवर संताप व्यक्त करत बांगड्या भेट देण्याचा प्रयत्न केला.

गनिमी काव्याने पाण्याच्या टाकीवर चढत आंदोलन

दरम्यान, धनंजय देशमुख यांनी गनिमी काव्याने पाण्याची टाकीवर चढत आंदोलन केले. आंदोलनाला गावकरीही उपस्थित होते. बीड पोलीस प्रशासन आणि मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील हे सुद्धा आंदोलनस्थळी होते. त्यांनी दोन तासांपासून धनंजय देशमुख यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत टाकीवरून खाली उतरण्याचा सल्ला दिला. मात्र, धनंजय देशमुख यांनी पाण्याची टाकीवर गेल्यानंतर एक शिडी काढून ठेवल्याने त्यांच्यापर्यंत पोलिसांना पोहोचणे शक्य नव्हतं. त्यामुळे पोलिसांकडून अग्निशमन दलाच्या गाडीला पाचरण करण्यात आले.दोन तासांच्या मनोज जहांगे पाटील यांच्या विनवणीनंतर धनंजय देशमुख टाकीवरून खाली उतरले. 

एसपींशी बोलण्यास थेट नकार

आंदोलनामध्ये संतोष देशमुख यांची कन्या वैभवीने सुद्धा पाण्याच्या टाकीवर चढत आंदोलन केलं. वैभवीला सुद्धा खाली उतरवण्यात आले.यावेळी बोलताना धनंजय देशमुख यांनी एसपींशी बोलण्यास थेट नकार दिला. मनोज जरांगे पाटील यांनी त्यांना विनवणी करत आपण सोबतच आहोत दिवसभरात ज्यांच्याशी बोलायचं आहे त्यांच्याशी बोलणं करून घेऊ, मात्र आपण खाली उतरा असे आवाहन केले. दोन तासांच्या विनवणीनंतर धनंजय देशमुख खाली उतरले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram