Bhagwan Bhaktigad Beed : भगवान भक्ती गडावर दसरा मेळाव्याची जय्यत तयारी

Continues below advertisement

Bhagwan Bhaktigad Beed : भगवान भक्ती गडावर दसरा मेळाव्याची जय्यत तयारी  विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं असून आज एकनाथ शिंदे गट (Eknath Shinde), उद्धव ठाकरे गट (Uddhav Thackeray) या दोन पक्षांच्या दसरा मेळाव्यासह बीडमध्ये पंकजा मुंडे (Pankaja Munde)-धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) यांचे स्वतंत्र मेळावे होणार आहे. त्यामुळे आज दसरा मेळाव्यांमध्ये (Dasara Melava 2024) आवाज कोणाचा घुमणार?, याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.   ठाकरे गटाचे दसरा मेळावा छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर सायंकाळी 5 वाजता, तर शिंदे गटाचा दसरा मेळावा आझाद मैदानावर सायंकाळी 5 वाजता होणार आहे. ठाकरे गटाकडून दीड ते दोन लाख लोक बसतील अशी आसन व्यवस्था करण्यात आली असून शिंदे गटाकडून एक ते दीड लाख लोक बसतील अशी आसन व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे आज गर्दीचा उच्चांक कोण मोडणार, याकडे देखील सर्वांच्या नजरा लागल्या आहे.   बीडमध्ये दोन दसरा मेळावे-  बीडमध्ये मुंडे भाऊ-बहिणीचा मेळावा सकाळी 11 च्या आसपास आणि मनोज जरांगेंचा दसरा मेळावा सकाळी 11.30 च्या जवळपास सुरु होणार असल्याची माहिती मिळत आहे.  दरम्यान मनोज जरांगेंचा पहिल्यांदाच दसरा मेळावा होणार आहे. तर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या दसरा मेळाव्यात ओबीसी आंदोलक नेते लक्ष्मण हाके देखील उपस्थित राहणार आहे.  मी येतोय, तुम्हीही या, असं म्हणत लक्ष्मण हाके यांनी सर्वांना या मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram