Beed Forced Abortion : मुलाच्या हव्यासापोटी बळजबरीनं गर्भपात;सासू, पती आणि डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल
abp majha web team
Updated at:
27 Jul 2022 12:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुलाच्या हव्यासापोटी विवाहितेचा निर्दयीपणे अवैधरित्या गर्भपात केल्याची घटना समोर आलीय... विवाहित महिलेच्या तक्रारीवरुन सासू, पती आणि डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय... याप्रकरणी परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यात महिलेच्या तक्रारीवरून सासू पती आणि डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नीने गर्भपात करण्यास नकार दिला... पण पती आणि सासू यांच्यासोबत वारंवार वाद होऊ लागले आणि यानंतर एकेदिवशी पती आणि सासूने डॉक्टरला घरी बोलवून तापेचं इंजेक्शन देतो म्हणून डॉक्टरांनी सदर महिलेला गर्भपाताचे इंजेक्शन देत गर्भपात केल्याची तक्रार विवाहित महिलेनं केलीय...