Beed Parli : परळीत धडाडणार दोन तोफा, ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेचा बीडमध्ये समारोप
बीडमध्ये आज संजय राऊत आणि सुषमा अंधारेंची सभा होणार आहे.. ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेचा आज बीडमध्ये समारोप होणार आहे.. त्यानिमित्तानं संजय राऊत परळी दौऱ्यावर आहेत.. आजच्या सभेत ठाकरे गटाच्या दोन तोफा, अर्थात राऊत आणि अंधारे, हे कुणावर हल्लाबोल करतात ते पाहावं लागेल. मागच्या काही महिन्यात पहिल्यांदाच बीड शहरामध्ये ठाकरे गटाचा इतका मोठा कार्यक्रम होतोय.. सुषमा अंधारे स्वतः बीडच्या आहेत.. त्यांनी स्वतःच्या नेतृत्वात पहिल्यांदाच सभेची तयारी केली आहे.