Beed Majalgaon Dam : मराठवाड्यात पावसानं दडी मारली, बीडच्या माजलगाव धरणात फक्त 16 टक्के पाणीसाठा
Continues below advertisement
Beed Majalgaon Dam : मराठवाड्यात पावसानं दडी मारली, बीडच्या माजलगाव धरणात फक्त 16 टक्के पाणीसाठा
सात जून रोजी माजलगाव धरणामध्ये 23 टक्के पाणी होते.. आता ऑगस्ट उजाडलाय म्हणजे तब्बल दोन महिन्यानंतर पावसाळ्यामध्ये माजलगाव धरणाचे पाणी 16 टक्के वर आले.. म्हणजे पावसाळ्याच्या दोन महिन्यात माजलगाव धरणातील पाणी वाढणे ऐवजी ते सात टक्क्यांनी कमी झालाय.. यावरून मराठवाड्यामध्ये यावर्षी पावसाची किती मोठी तूट आहे हे आपल्याला लक्षात येतं जी परिस्थिती बीडची हीच परिस्थिती मराठवाड्यातील बहुतेक जिल्ह्यांची झाली आहे..नाही म्हणायला मध्यंतरी झालेल्या रिमझिम पावसावरती पिके तरी मात्र आठवडाभरात जर पावसाने परत आगमन नाही केलं तर पिण्याच्या पाण्यापेक्षाही पीक हातची जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
Continues below advertisement
Tags :
Beed