Beed Jaydatta Kshirsagar : जयदत्त क्षीरसागर यांची ठाकरे गटातून हकालपट्टी
जयदत्त क्षीरसागर यांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे. यापुढे जयदत्त क्षीरसागर आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेशी काहीही संबंध नाही, असं शिवसेनेचे बीड जिल्हा संपर्कप्रमुख धोंडूदादा पाटील आणि जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी जाहीर केले आहे. दोन दिवसांपूर्वी क्षीरसागर यांनी बीडमधील विकास कामांच्या शुभारंभावेळी शिंदे आणि फडणवीस यांच्यासह हजेरी लावली होती.. त्यामुळे ही कारवाई केल्याचं बोललं जातंय.