Beed: सासऱ्याच्या प्रेमविवाहाचं खापर सुनेवर! पुढच्या 7 पिढ्यांना बहिष्कार, जातपंचायतीचा निर्वाळा

Beed Jat Panchayat Controvercy: सासऱ्यानं समाजाची परवानगी न घेता प्रेमविवाह केल्याची शिक्षा आता सुनेला भोगावी लागतेय.सासऱ्याच्या प्रेमविवाहाचं खापर सुनेवर फोडत पुढील सात पिढ्या समाजातून बहिष्कृत करण्याचा धक्कादायक निर्णय  जातपंचायतीनं घेतल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बीडच्या आष्टी पोलीस ठाण्यात नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला. हा प्रकार 22 सप्टेंबर 2024 रोजी आष्टी तालुक्यातील डोईठाण येथे घडला. प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला. मात्र महिलेच्या तक्रारीवरून 9 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला. या निमित्ताने पुन्हा एकदा जात पंचायतीचा मुद्दा समोर आला आहे.

नक्की प्रकरण काय?

बीडमध्ये सध्या जातपंचायतीतले हे प्रकरण चर्चेचा विषय ठरला आहे. सासऱ्यानं समाजाची परवानगी न घेता प्रेमविवाह केला आणि त्याचीच शिक्षा सुनेला भोगावी लागत आहे. मालन फुलमाळी यांचे सासरे नरसु फुलमाळी यांनी समाजाची परवानगी न घेता प्रेमविवाह केला होता. यांची जात तीरमाली आहे. सासू-सासर्‍याच्या मृत्यूनंतर 2017 मध्ये मालन फुलमाळी यांना जातीत सामावून घेण्यात आल. मात्र आता जातपंचायतीचा दंड न भरल्याचे कारण देत त्यांना पुन्हा एकदा बहिष्कृत करण्यात आलं. सध्या हे कुटुंब कडा कारखान्यावर वास्तव्यास आहे. आष्टी पोलीस ठाण्यात नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असता तरी यातील आरोपींना अटक करून न्याय देण्याची मागणी पीडित कुटुंबाने केली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola