Beed Atiq Ahmed Banner : अतिक अहमदच्या समर्थनार्थ माजलगाव शहरामध्ये बॅनर, दोन आरोपींना अटक
प्रयागराजमध्ये गोळीबारात मृत्यू झालेले अतिक अहमद आणि त्याचा भाऊ आश्रम यांच्या समर्थनार्थ माजलगाव शहरामध्ये बॅनर लावण्यात आले होते. ही गोष्ट पोलिसांच्या लक्षात येतात पोलिसांनी तात्काळ हे बॅनर उतरवले असून दोन आरोपींना अटक केली आहे.. अतिक अहमद आणि आश्रम या दोघांचा शहीद म्हणून या बॅनरवर उल्लेख करण्यात आला होता तर मोहसीन भैया मित्र मंडळ यांच्या वतीने हे बॅनर लावण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे त्यानंतर पोलिसांनी दोन आरोपीला अटक केली असून मोहसीन पटेल याचा शोध पोलीस घेत आहेत..