Anjali Damania : Beed मध्ये 1,222 शस्त्र परवाने कसे वाटले? गोळीबाराचा व्हिडिओ पोस्ट ,दमानियांचा सवाल

Continues below advertisement

बीड : हवेत गोळीबार करून व्हिडिओ काढणाऱ्या धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यावर अखेर बीडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एबीपी माझाने याबाबतचे व्हिडिओ दाखवल्यानंतर आणि सोशल मीडियातून हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अखेर पोलिसांनी कारवाई करत संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे (dhananjay munde) यांचा कार्यकर्ता कैलास फड याने हवेत गोळीबार केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमातून समोर आला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करत हा व्हिडिओ शेअर करत बीडमधील गुंडागर्दी व दहशतीवरुन प्रश्न उपस्थित केले होते. या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. विशेष म्हणजे, बीडचे (beed) नवे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत हेही अॅक्शन मोडमध्ये असून लवकरच संतोष देशमुख प्रकरणातील उर्वरीत आरोपीला अटक करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. 

बीड : मधील गोळीबार प्रकरणानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी बीड जिल्ह्यातील शस्त्र परवानाधारकांबाबत ट्विट करत सवाल उपस्थित केले आहेत. परभणीत 32 आणि अमरावती ग्रामीणमध्ये 243 परवाने असताना एकट्या बीडमध्ये 1,222 शस्त्र परवानाधारक का? असा सवाल विचारत दमानियांनी एक व्हिडीओ पोस्ट केला. दमानियांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एक तरुण हवेत गोळीबार करताना दिसतोय. वाल्मिक कराडच्या नावावर परवाना असताना, विनापरवाना कैलास फड आणि निखील फड बंदूक कशी चालवतात? असा सवाल दमानिया यांनी विचारला. बीड पोलिसांनी या तरुणांना अटक करावी आणि या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक व्हिडीओ शेअर करत सरकारला प्रश्न विचारला होता. या व्हिडीओमध्ये मंत्री धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता कैलास फड हा हवेत गोळीबार करताना दिसत 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram