Amruta Khanvilkar लावणीकडे खालच्या नजरेने पाहणं पाप, लावणीचा आदर करायला शिका

Continues below advertisement

 बीडच्या परळीत नाथ प्रतिष्ठान आयोजित वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये अभिनेत्री अमृता खानविलकरनं लावणी परफॉर्मन्स सादर केला. लावणीचा कार्यक्रम ठेवला म्हणून वैद्यनाथ गणेशोत्सवावर काही दिवसांपूर्वी टीका करण्यात आली होती. त्याचाच दाखला देत अमृतानं टीका करणाऱ्यांना उत्तर दिलं.  लावणी ही महाराष्ट्राची ओळख आहे. तिला खालच्या नजरेतून बघणे पाप आहे..केवळ व्हियूज मिळतात म्हणून लावणीला ट्रोल करु नका. अशा शब्दात ट्रोलर्सचा समाचारच यावेळी अमृतानं घेतला. ((तसंच लावणीचा आदर करायला शिका असंही अमृतानं यावेळी जाहीर आवाहन केलं.))

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram