Baramati Cow Baby Shower : बारामतीत खिल्लार गायीचे डोहाळ जेवण, गायाची ओटभरणी करत काढली मिरवणूक
बारामती तालुक्यातील माळेगंवात धंगेकर कुटुंबानं खिल्लार गायीचे डोहाळे जेवण केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंंय. हौसा नाव असलेल्या गायीला पैठणी परिधान करुन मिरवणूक काढण्यात आली. यानिमित्त महिलांसाठी विविध स्पर्धा घेऊन त्यांना येवला पैठणी साडी भेट देण्यात आली.