नवी मुंबईत ठिकठिकाणी राज ठाकरेंच्या स्वागतासाठी बॅनरबाजी, न्यायालयाच्या वॉरंटनंतर राज ठाकरे कोर्टात

Continues below advertisement

नवी मुंबई: वाशी टोल नाका तोडफोड प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर 2014 साली वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. अनेक वेळा समन्स पाठवूनही राज ठाकरे उपस्थित न राहिल्याने बेलापूर कोर्टाने त्यांच्या विरोधात वॉरंट काढले होते. त्यामुळे आज राज ठाकरे स्वत: कोर्टात हजर राहणार आहेत. यासाठी मनसेने जोरदार तयारी सुरू केली आहे. शहरात बॅनरबाजी करण्यात आली आहे. चार ते पाच हजार कार्यकर्ते कोर्टाच्या आवारात उपस्थित राहणार आहेत. नवी मुंबई महानगर पालिका निवडणूक येत्या एप्रिल महिन्यात होणार असल्याने मनसेला वातावरण निर्मिती करण्यासाठी आयती संधी चालून आली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram