मानखुर्दमधील आग अजूनही धुमसतीच, अग्निशमन दलाकडून विझवण्याचे प्रयत्न सुरु, कोट्यवधींचं नुकसान

Continues below advertisement
Mumbai Mankhurd Fire : मानखुर्द येथील मंडाला परिसरात काल दुपारी भीषण आग लागली होती. या आगीत जीवितहानी झाली नसली तरी करोडो रुपयांचं नुकसान झालं आहे. यावेळी आग विझवताना एक अग्निशमन दलाचा जवान किरकोळ जखमी झाला आहे. दरम्यान आग नियंत्रणात आली असली तरी अजूनही पूर्णपणे विझण्यासाठी दुपार होईल अशी शक्यता अग्निशमन दलाच्या जवानांनी व्यक्त केली आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणी महापालिका विरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यामध्ये शीत युद्ध पाहायला मिळत आहे. महापालिकेच्या म्हणण्यानुसार याठिकाणी जे अवैध धंदे आहेत या संपूर्ण भाग जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत येतो. त्यामुळे याबाबतची माहिती आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाला सांगितली होती. परंतु त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा प्रकार घडला आहे. तर दुसरीकडे जिल्हाधिकारी कार्यालयाने आम्ही याठिकाणी कारवाई केली होती परंतु कारवाई नंतर पुन्हा एकदा याठिकाणी असणारे माफिया सक्रिय होतात असं उत्तर देण्यात आलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram