MNS : Mumbai : ....तर तुमची दैवतं देखील आमच्या राज्यात आहेत : Bala Nandgaonkar
शिवडी विधानसभा क्षेत्रातील मनसेच्या लालबाग येथील कार्यालयाच्या वर्धापनदिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हजेरी लावली. यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर, पदाधिकारी आणि मुंबईतील कार्यकर्त्यांची गर्दी बघायला मिळाली. यावेळी माध्यमांशी बोलताना बाळा नांदगावकर यांनी कर्नाटकात झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विडंबनाबद्दल भाष्य केले. कोणाच्याही दैवतांना अपमान व्हायला नको, हे दूर्दैवी असल्याचं ते म्हणालेत. सोबतच आमची दैवतं जर तुमच्या राज्यात आहेत तर तुमची देखील दैवतं आमच्या राज्यात आहेत, असा धमकीवजा इशारा देताना कर्नाटकातल्या सरकारनं ह्यासंदर्भात कारवाई करावी असे आवाहन देखील केले.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Marathi News