Air Bags:नव्या वर्षात वाहनांच्या किमती वाढण्याची शक्यता,M -1 श्रेणीतील वाहनांना 6 एअरबॅग्ज अनिवार्य

Continues below advertisement

नव्या वर्षात मोठी कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. नव्या वर्षात 8 आसनी किंवा एम-1 श्रेणीतील वाहनांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. कारण  येत्या 1 ऑक्टोेबरपासून या गाड्यांना एअरबँग्जसंबंधी नव्या नियमांचं पालन करावं लागणार आहे. नव्या नियमानुसार या गाड्यांमध्ये आता 6 एअरबँग्ज बंधनकारक आहेत. या नव्या नियमामुळे गाड्यांच्या किमती 50 हजारांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. सध्या बहुतेक कंपन्या गाड्यांच्या केवळ टॉप व्हेरियंट मध्ये ही सुविधा पुरवत होत्या मात्र 1 ऑक्टोबरनंतर एम-१ श्रेणीच्या किंवा 8 आसनी क्षमतेच्या सर्व वाहनांना 6 एअरबॅग्ज अनिवार्य करण्यात आल्या आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram