First CNG Bike review Pune : Nitin Gadkari यांनी लाँच केलेल्या पहिल्या सीएनजी बाईकचा रिव्ह्यू

Continues below advertisement

First CNG Bike review Pune : Nitin Gadkari यांनी लाँच केलेल्या पहिल्या सीएनजी बाईकचा रिव्ह्यू पुणे : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरवाढीमुळे वाहनचालक त्रस्त आहेत. तर, सरकारकडूनही पेट्रोल-डिझेलला पर्याय शोधण्यात येत असून सध्या सीएनजी (CNG) वाहनांना मोठी मागणी असून चारचाकी सीएनजी वाहनांची बाजारात चलती असल्याचं पाहायला मिळते. त्यातच, आता बजाजकडून जगातील पहिली सीएनजी बाईक लाँच करण्यात आली आहे. केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याहस्ते आज पिंपरी चिंचवडमध्ये या बाईकचा लाँचिंग सोहळा पार पडला. यावेली, ही सीएनजी बाईक जगातील पहिली सीएनजी दुचाकी असल्याचा दावा बजाजकडून (Bajaj) करण्यात आला आहे.  पेट्रोल आणि सीएनजी अशी हायब्रीड बाईक असून 2 किलो सीएनजीमध्ये तुम्ही 230 किमी प्रवास करू शकता.  तर, 2 लीटर पेट्रोल आणि 2 किलो सीएनजीमध्ये तुम्हाला 330 किमीचा टप्पा गाठता येईल. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram