रिक्षाचालकाने दागिने, कपडे काढून घेतल्याचा महिलेचा आरोप, Aurangabad च्या Waluj ची घटना

Continues below advertisement

औरंगाबादच्या वाळूज परिसरातील बजाज गेटसमोर रिक्षा चालकानं आपल्या गळातील दागिने आणि कपडे काढून घेतल्याचा आरोप एका महिलेनं केलाय. हा रिक्षाचालक महिलेच्या ओळखीचा असल्याचं देखील समोर येतेय. मात्र या प्रकरणात अद्याप कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, विशेष म्हणजे या प्रकरणात महिलेनं मात्र कोणतीही तक्रार अद्याप दिलेली नाही. त्यामुळे औरंगाबादमध्ये नेमकं सुरु तरी काय आहे. असा सवाल उपस्थित होतोय. पहिल्या घटनेत रिक्षाचालकाच्या छेडछाडीमुळे तरुणीला चालत्या रिक्षातून उडी मारावी लागली. तर दुसरीकडे आता ही अशी एक घटना समोर येतेय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram