Aurangabad : एकही डोस न घेतलेले विद्यार्थी, प्राध्यापक यांना दर आठवड्याला RTPCR चाचणीची सक्ती ABP Majha

लसीकरणाचा एक डोस घेतलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थी आणि प्राध्यापकला  प्रत्येक 15 दिवसाला आणि एकही डोस घेतली नसलेल्या प्राध्यापक विद्यार्थ्यांची आठवड्याला RT-PCR चाचणी करण्याचा निर्णय औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी घेतलाय. महाविद्यालयात सुरू झाल्याने गर्दी वाढते आहे विद्यार्थी एकमेकांच्या जवळ बसत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. यानंतर वेळप्रसंगी जिल्ह्यातील सर्व नागरिकांसाठी हा नियम लागू करण्यात येणार आहे असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. कोरोनाचा नवा स्ट्रेन ओमायक्रॉनपासून बचाव करण्यासाठी लसीकरण हाच प्रभावी उपाय आहे.  त्यामुळे पात्र नागरिकांनी तात्काळ लसीकरण करुन लसीकरण मोहिमेला प्रतिसाद द्यावा, जिल्ह्यातील जे नागरिक दुसऱ्या डोससाठी पात्र आहेत परंतु त्यांनी अद्यापही दुसरा डोस घेतलेला नाही अशा नागरिकांनी  १५ डिसेंबरपर्यंत दुसरा डोस पूर्ण करावा, अन्यथा शासकीय पर्याय वापरुन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola