Sanjay Shirsat Full PC on Tweet: ते ट्वीट टेक्निकल प्रॉब्लेम,संजय शिरसाट यांचं स्पष्टीकरण Aurangabad

Continues below advertisement

Sanjay Shirsat : राजकारण सगळ्यांना पुढे जायचे असते. त्यामुळं मंत्री व्हावे ही माझी इच्छा असल्याचे मत शिंदे गटाचे औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी व्यक्त केले. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांबरोबरच (CM Eknath Shinde) आहे आणि त्यांच्यासोबच राहणार असल्याचे शिरसाट म्हणाले. काल गेलेली पोस्ट चुकून गेली होती. माझ्या मोबाईलचा टेक्निकल प्रॉब्लेम झाल्यामुळं ती पोस्ट गेल्याचा खुलासा शिरसाट यांनी केला. दरम्यान, ठाकरे कुटुंबाबद्दल अपशब्द निघणार नाही, हीच आमची भूमिक आहे. मात्र, टीका केली तर उत्तर मिळणार असल्याचेही शिरसाट यावेळी म्हणाले. मी कॅबिनेट मंत्रीपदाची मागणी केली आहे. मला औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्रीपद द्यावे अशी मागणी केल्याचंही शिरसाट यांनी सांगितले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram