Sandeepan Bhumre on Ajit Pawar : वाईन शॉप ते स्पीड ब्रेकर, अजित पवारांचा टोला; भुमरेंचा पलटवार
गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादमध्ये वेगवेगळ्या दारूच्या दुकानासमोर टाकण्यात आलेल्या ब्रेकरची जोरदार चर्चा पाहायला मिळतेय.. शिंदे गटाचे नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी विकासकामे करण्यापेक्षा दारूची दुकाने थाटली असून...आता त्यासमोर ग्राहकांनी थांबावं म्हणून गतीरोधक बसवल्याची टीका विरोधकांकडून केली जातेय..यावरुन आज विरोधी पक्षनेते अजित पवारांनीही भुमरेंवर निशाणा साधलाय. रस्ते विकास काम करायच्या ऐवजी मंत्री दारूची दुकानं वाढवण्यात व्यस्त असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय.. यावर आता भुमरेंनीही अजित पवारांना उत्तर दिलंय...