Sambhajinagar News : छ. संभाजीनगरमध्ये दोन दुचाकीस्वारांकडून दुकानावर दगडफेक ABP Majha

Continues below advertisement

संभाजीनगर -  छत्रपती संभाजीनगरच्या फाजलपुरा भागात असलेल्या एका बुटीकच्या दुकानावर दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. जफर अली मर्चेंट असे या दुकानाचे नाव आहे.  या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. 'पतंग को साथ न दिया तो जला दूंगा' असे हल्लेखोरांनी धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. या हल्ल्यानंतर चंद्रकांत खैरे आणि माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी धाव घेतली. याप्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram