Raj Thackeray यांची कलम 41 अ अंतर्गत चौकशीची शक्यता, Aurangabad Police बोलवण्याची शक्यता

Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रक काढून मनसे कार्यकर्त्यांना आणि जनतेला भोंग्यांविरोधात आंदोलन तीव्र करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिथं अनधिकृत भोंगे तिथं हनुमान चालिसा लावा. त्यांनाही कळू दे त्रास काय असतो असं राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात म्हंटलं आहे. तर  भोंग्यांवर बांग ऐकू येताच पोलिसांना फोन करुन तक्रारी द्या असं आवाहन देखील राज ठाकरेंनी नागरिकांना केलं आहे. याशिवाय बाळासाहेब ठाकरे यांनी भोंगे उतरवा असं सांगितलं होतं तर बाळासाहेबांचं ऐकणार की शरद पवारांचं असा सवाल राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केला आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola