Nirbhaya Fund | 150 कोटींचा निर्भया निधी खर्च का केला नाही? हायकोर्ट | ABP Mahja
150 कोटींच्या निर्भया निधीपैकी एकही रुपया खर्च झालं नाही अशी बातमी एबीपी माझाने दाखवली होती. त्याची दखल औरंगाबाद खंडपीठानं घेतली आणि राज्य आणि केंद्र शासनाच्या महिला व बाल कल्याणविकास विभागाच्या प्रधान सचिवांसह, राज्य शासनाच्या गृह विभागाच्या सचिव आणि औरंगाबाद पोलिस आयुक्तांनाही नोटिसा बजावण्याचे आदेश दिले आहेत. सहा आठवड्यात शपथपत्राद्वारे उत्तर दाखल करावे, असं आदेशात म्हटलं आहे.