Raj Thackeray Aurangabad: राज ठाकरेंची तोफ कुणावर धडाडणार? ABP Majha
औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेसाठी राज ठाकरे आज पुण्याहून रवाना होणार आहेत. राज ठाकरे यांच्या पुण्यातील घराबाहेर धार्मिक विधी पार पडणार आहेत. राजमहाल इथं १०० ते २०० पुरोहितांच्या उपस्थितीत हे विधी पार पडतील. शेकडो गुरुजी राज ठाकरे यांना शुभ आशीर्वाद देतील. त्यानंतर राज ठाकरे पुण्याहून औरंगाबादकडे रवाना होतील. राज ठाकरे यांच्यासोबत मनसे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि काही नेते औरंगाबादच्या दिशेने निघणार आहेत.