
Aurangabad : औरंगाबादचं संभाजीनगर होणार की नाही? सरकारच्या निर्णयाला मुंबई हायकोर्टात आव्हान
Continues below advertisement
सत्तांतराआधी ठाकरे सरकारने औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शिंदे सरकारने ठाकरे सरकारच्या निर्णयाला स्थगिती देऊन हाच निर्णय नव्याने घेतला. या निर्णयानुसार औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर करण्यास मंजुरी देण्यात आली. आता राज्य सरकारच्या याच निर्णयाला मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आलंय. औरंगाबादचे रहिवासी मोहम्मद मुश्ताक अहमद, राजेश मोरे आणि अण्णासाहेब खंदारे यांनी ही जनहित याचिका दाखल केलीय. या याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे.
Continues below advertisement