माझा विठ्ठल माझी वारी! सर्वधर्मसमभावाचा संदेश देणारं संत एकनाथांचं भारुड, हजरत मौला मौला...

Continues below advertisement

संत तुकोबारायांच्या पालखीसोबत आज संत एकनाथ महाराजांच्या पालखीचंही पैठणवरुन प्रस्थान ठेवलंय. आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या सात मानाच्या पालखी सोहळा पैकी एक संत एकनाथ पालखी सोहळा, साडेचारशे वर्षापेक्षा अधिकची या पालखी सोहळ्याला परंपरा आहे. मात्र इतिहासात पहिल्यांदाच मोजक्या वारकऱ्यांचं पालखीने प्रस्थान ठेवले आहे. एरवी हजारो वारकऱ्यांच्या उपस्थित पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो, मात्र यावेळी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पायी पालखी सोहळा रद्द करण्याचा निर्णय पालखी विश्वस्तांनी घेतला होता. दशमीपर्यंत ही पालखी समाधी मंदिरातच मुक्कामी असणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram