Bhumre Land Row | 'नवाबाशी वडिलोपार्जित संबंध': भुमरे कुटुंबाच्या चालकाचा खुलासा
छत्रपती संभाजीनगरमधील जमीन वादात नवा खुलासा. भुमरे कुटुंबाचा चालक जावेद रसूल शेख याने एबीपी माझाशी संवाद साधला. त्याने सांगितले की, 'माझे वडील आणि नवाब साहेब यांचे खूप जुने संबंध आहेत. त्यामुळे त्यांनी जमिनीचा हिब्बानामा केला.' जावेदने खासदार संदिपान भुमरे आणि आमदार विलास भुमरे यांचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले. आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.