Kashid Sea Picnic Accident : सहलीला आलेल्या विद्यार्थ्यांवर काळाचा घाला
रायगडमधल्या काशीद येथील समुद्रात बुडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय. औरंगाबादच्या कन्नड येथील साने गुरुजी विद्यालयातील ते विद्यार्थी आहेत. या घटनेत तिघांना वाचवण्यात यश आलं असून, त्यांच्यावर अलिबाग जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हे विद्यार्थी सहलीसाठी रायगडमध्ये आले होते. साने गुरुजी विद्यालयातून १७ विद्यार्थी आणि त्यांच्यासोबत पाच शिक्षक होते.
Tags :
Raigad Student Kannada Aurangabad Sane Guruji Student Death Kashid Samudra Alibaug District Hospital