Ajanta Caves परिसरात सेल्फीच्या नादात तरुण पडला कुंडात, दोरीच्या साहाय्यानं तरुणाला वाचवण्यात यश
अजिंठा लेणी परिसरात सेल्फी काढणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं असतं. मात्र हा तरुण अगदी थोडक्यात बचावला आहे. अजिंठा लेणी परिसरात सेल्फी काढत असताना एका कुंडामध्ये तरुण पडला. सुदैवानं दोरीच्या सहाय्यानं स्थानिकांनी या तरुणाला सुखरुप बाहेर काढलं.