Ambadas Danve on Eknath Shinde : अंबादास दानवे - एकनाथ शिंदेंची फोनवर चर्चा, काय झालं बोलणं?

Continues below advertisement

Ambadas Danve on Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांनी मलाही फोन केला होता असा गौप्यस्फोट शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी केलाय. फोन करून मी निवडणुकीत तुला मदत केली असल्याचं सांगितले, पण शिवसेना म्हणून मला मदत केली आहे, असं सांगून उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणार असल्याचे सांगितले,असेही दानवे म्हणाले. शिवसेनेमधून एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन केल्यानंतर आता शिवसेनेच्या वतीने जोरदार पक्षबांधणी मेळावे घेण्यात येत आहेत. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी देखील कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते. यात मलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. परंतु यावर आपण बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, तुम्ही जे माझ्यासाठी केले ते शिवसेना म्हणून केले व्यक्तीगत थोडी केले असे उत्तर दिल्याचे आमदार अंबादास दानवे यांनी सांगितले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram