Chhatrapati Sambhajinagar : देवदर्शनासारखी फटाक्यांसाठी गर्दी, फटाक्यांसाठी पहाटेपासून रांगा, खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड
Continues below advertisement
छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) गंगापूरमध्ये (Gangapur) फटाके खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. 'कमी दरामध्ये फटाके मिळत असल्यामुळे इथे ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड उडाली आहे,' असं चित्र दिसत आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर, गंगापूरमधील मुंदडा फटाका स्टॉलवर (Mundada Fataka Stall) सकाळी पाच वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. मंदिरामध्ये देवदर्शनासाठी लागतात तशा रांगा फटाक्यांच्या स्टॉलवर पाहायला मिळत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. स्वस्त दरात फटाके मिळत असल्याने केवळ स्थानिकच नाही, तर आसपासच्या भागातूनही नागरिक येथे खरेदीसाठी येत असल्याचे दिसून येत आहे. या गर्दीमुळे परिसरातील वाहतुकीवरही परिणाम झाला असून, दिवाळीच्या खरेदीचा उत्साह शिगेला पोहोचल्याचे हे द्योतक आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement