Aurangabad Police: औरंगाबाद पोलीस आयुक्तालयासमोर पेटवून घेतलेल्या महिलेचा मृत्यू ABP Majha
Continues below advertisement
शेजारी राहणाऱ्या महिलेसह तिचा नवरा, मुलगा आणि स्वत:चा पती सतत मारहाण करीत होते. त्यांच्यावर ठोस कार्यवाही होत नसल्यामुळे महिलेने थेट पोलीस आयुक्तालय गुरुवारी गाठले. आयुक्तालयाच्या पायऱ्याजवळ येत अंगावर डिझेल ओतुन घेत स्वत:ला पेटवून दिले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. उपस्थितांनी महिलेची आग विजवत घाटी रुग्णालयात दाखल केले. जळीत वार्डात उपचार सुरु असून, महिला 60 टक्क्यापेक्षा अधिक जळाल्याची माहिती घाटीतील डाॅक्टरांनी दिली. नातेवाईकांनी पोलिसांच्या दुर्लक्षामुळेच महिलेने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप केला आहे.
Continues below advertisement
Tags :
Admitted Beating Diesel Ghati Hospital Arson Police Commissionerate Concrete Action Burnt Ward