Chhatrapati Sambhajinagar Robbery : लड्डांच्या घरी दरोडाप्रकरणी रोहिणीला अटक, 22 तोळे सोनं ,7 जिवंत काडतुसं जप्त

Chhatrapati Sambhajinagar Robbery :  लड्डांच्या घरी दरोडाप्रकरणी रोहिणीला अटक, 22 तोळे सोनं, 7 जिवंत काडतुसं जप्त

Chhatrapati Sambhajinagar Crime:  छत्रपती संभाजीनगरमधील वाळुजमधील सर्वात मोठ्या दरोड्याच्या घटनेत एन्काऊंटर झालेल्या अमोल खोतकरच्या बहिणीला पोलिसांनी अटक केली आहे . रोहिणीकडे 22 तोळे सोने सापडले असून घराची झडती घेतल्यानंतर सात जिवंत काडतुसेही सापडली आहेत . आठवडाभरापूर्वी तिच्याच सांगण्यावरून दरोड्यात चोरी झालेले 30 किलो चांदी एका गॅरेजमध्ये ठेवलेल्या गाडीत सापडली होती . या प्रकारामुळे आता या संपूर्ण घटनेला वेगळेच वळण लागले आहे .  (Santosh Ladda Robbery)

छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज मधील उद्योजक संतोष लड्डा यांच्या निवासस्थानी 15 मे रोजी मोठा दरोडा पडला होता .या दरोड्यात संशयित आरोपी अमोल खोतकर याचा पोलिसांनी एन्काऊंटर केला . या दरोड्यात साडेपाच किलो सोनं 32 किलो चांदी आणि 70 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता . या प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत . दरम्यान,  एन्काऊंटर झालेल्या अमोल खोतकरच्या बहिणीला  पोलिसांनी अटक केली आहे .रोहिणीकडेच 22 तोळे सोनं सापडलं असून घराची झडती घेतल्यानंतर सोन्यासोबत सात जिवंत काढत असेही सापडले आहेत .

एन्काऊंटर झालेल्या अमोल खोतकरच्या बहिणीला अटक

पोलिसांनी सुपारी घेऊन भावाचा एन्काऊंटर केला असा आरोप लड्डा दरोडा प्रकरणात आरोपी अमोल खोतकर याच्या बहिणीने रोहिणी खोतकरने काही दिवसांपूर्वी केला होता. माझा भाऊ मला नेहमी सांगायचा की त्याला मारण्यासाठी सुपारी दिली आहे, जी एका श्रीमंत व्यक्तीने दिली आहे. मी घरी आलो नाही तर समजून जा संपवले आहे, असं तो सतत म्हणायचा असा आक्रोश रोहिणी खोतकरने केला होता. त्यानंतर आता त्याच्या बहिणीलाच अटक करण्यात आल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola